विभागीय चौकशी म्हणजे काय ?
शासकीय अधिकारी कर्मचारी यांना त्यांचे कर्तव्य पार पाडताना, कर्मचाऱ्याचे वर्तन कसे असावे यासाठी महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम १९७९ मध्ये काही तरतुदी ठरवून दिलेल्या आहेत तसेच कार्यालयीन कामकाज किंवा कर्तव्य बजविताना प्रशासकीय,लेखाविषयक व तांत्रिक स्वरूपाचे नियम, मार्गदर्शक तत्वे ठरवून दिलेले आहेत या नियमांचा, तत्वाचा भंग झाल्यास अशी कृती गैरवर्तनात मोडते. गैरवर्तनघडल्यास शिस्त भंगाची कारवाईस सामोरे जावे लागते. अधिकारी/कर्मचारी यांचे अशा प्रकारचे अनुचित स्वरुपाचे गैरवर्तन दखलपात्र असते. अशा प्रकारचे निषिद्ध वर्तन विचारात घेऊन शासकीय अधिकारी किंवा कर्मचारी यांचेविरुद्ध सुरु करण्यात आलेली शिस्तभंग विषयक कारवाईस विभागीय चौकशी /Departmental Enquiry असे म्हणतात. या कारवाईस खातेनिहाय चौकशी असेही म्हणतात. विभागीय चौकशी /Departmental Enquiry संदर्भात कथीत कसुरदार अधिकारी/कर्मचारी यांना महाराष्ट्र नागरी सेवा नियम (शिस्त व अपील) १९७९ नियम ८ चे तरतुदीनुसार व विभागीय चौकशी नियम पुस्तिका १९९१ मधील कार्यप्रणालीनुसार सक्षम प्राधिकारी यांनी दोषारोपपत्र देणे आवश्यक असते. अपचारी अधिकारी/कर्मचारी यांनी त्यांचेवरिल दोषारोप “नाकबुल” केल्यानंतर विभागीय चौकशी प्रक्रियामध्ये दोषारोपपत्राची शहनिशा, पुरावा म्हणून सादर केलेले दस्तऐवज व सरकारी साक्षीदार यांचे माध्यमातुन त्रयस्त चौकशी प्राधिकारणा समोर विभागीय चौकशी सुरु होते.
दोषारोप पत्र दिलेल्या अधिकारी किंवा कर्मचारी यास “अपचारी ” असे संबोधले जाते अपचारी म्हंनजे आरोपी नव्हे, विभागीय चौकशी प्रक्रिया न्यायसदृश स्वरुपाची असते. बहुतअंशी विभागीय चौकशीचे उगमस्थान तक्रार असून गंभीर स्वरुपाच्या प्रशासकीय, वित्तीय, तांत्रिक अनियमितता, गैरव्यवहार या बाबींचा तक्रारीमध्ये समावेश असतो प्राथमीक चौकशीत तक्रारीमध्ये तथ्थ दिसून आल्यास विभागीय चौकशीस(Departmental Enquiry) सामोरे जावे लागते यास्तव अधिकारी कर्मचारी यांनी आपले कर्तव्य बजविताना तक्रारी उदभवणार याची दक्षता घेणे कधीही हितकारक ठरते.
महाराष्ट्र नागरी सेवा नियमामध्ये वर्तनाची व्याख्या देण्यात आलेली नाही, तथापी अधिकारी/कर्मचारी यांना आपले कर्तव्य व जबाबदा-या पार पाडताना महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियमांचे पालन करावे लागते याशिवाय प्रचलित कायदे व नियमांचा, तसेच मार्गदर्शक तत्वांचा,कार्यध्दतीचा अवलंब करावा लागतो अधिकारी/कर्मचारी यांनी आपले कर्तव्य व जबाबदा-या पार पाडताना वरील बाबीचा भंग करून कर्तव्यात कसूर केला तर हया अनुचीत स्वरुपाच्या कृतीला गैरवर्तन असे म्हणतात.
0 #type=(blogger):
Post a Comment